मकळी
मकळी : (शेंगांवरील ढेकूण). या कीटकाचा समावेश हेमिप्टेरा गणाच्या लायजिईडी कुलात करतात. अफॅनस सॉर्डिडस हे याचे शास्त्रीय नाव आहे. ह्या कुलातील कीटक आकाराने लहान व रंगाने गडद तपकिरी असतात. यांच्या सु. २,००० जाती माहीत आहेत. मकळीचा उपद्रव मुख्यतः भुईमूग व तीळ या पिकाना होतो.